मुंबई : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आज मुंबईत या अकादमीसंदर्भात चर्चा झाली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतल्यानंतर त्याला रणजी क्रिकेट न खेळण्याची सूट दिल्याच्या मुद्द्यावर या भेटीला महत्त्व होते. शिवाय, गेल्या काही वर्षांत दुखापतींनी भारतीय गोलंदाजांना ग्रासले आहे, त्या प्रश्नावरूनही या भेटीकडे पाहिले जात होते. मात्र या भेटीनंतर द्रविडने पत्रकारांशी बोलणार नसल्याचे सांगितले तर गांगुली यांनी ही केवळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसंदर्भात भेट झाल्याचे स्पष्ट केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीबाबत वरिष्ठ क्रिकेटपटूंशी चर्चा करण्याची सूचना बीसीसीआय वरिष्ठ समितीने सौरव गांगुली यांना केल्याचे कळते.
राहुल-सौरव यांच्यात चर्चा
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आज मुंबईत या अकादमीसंदर्भात चर्चा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2019, 4:00 am