म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा खोखो संघटनेतर्फे रविवारी (२५ ऑगस्ट) जिल्हास्तरीय कुमार व किशोर गट संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
कांचनवाडी येथील राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत रविवारी सकाळी आठ वाजता निवड चाचणीस सुरवात होईल. गंगाधर मोदाळे, दीपक सपकाळ, श्रीपाद लोहकरे यांची निवड समिती संघाची निवड करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे व सचिव गोविंद शर्मा यांनी दिली.