अ‍ॅपशहर

करोनामुळे भारतीय वंशाच्या खेळाडूचा मृत्यू

भारतीय वंशाचे मॅरेथॉन धावपटू असलेले आमरिक सिंग यांचे इंग्लंडमध्ये करोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे वृत्त आले आहे, ते ८४ वर्षांचे होते. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील सिटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2020, 4:25 pm
करोना व्हायरसमुळे भारतीय वंशाच्या एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची वाईट घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aamrik singh


भारतीय वंशाचे मॅरेथॉन धावपटू असलेले आमरिक सिंग यांचे इंग्लंडमध्ये करोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे वृत्त आले आहे, ते ८४ वर्षांचे होते. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील सिटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमरिक हे १९६९ सालापर्यंत भारतात होते. त्यानंतर १९७० साली त्यांनी भारतामधूल रशियातील ग्लास्गो येथे जाण्याचा निर्णय घेतला. ते रशियात चबरेच वर्षे राहिले होते. एक भारतीय उद्योजक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्याचबरोबर एक मॅरेथॉनपटू म्हणूनही त्यांनी नाव कमावले होते. आतापर्यंत जवळपास ५६० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आमरिक यांचे निधन झाले, हे बातमी त्यांचा नातू पमन सिंग यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


पमन यांनी ट्विटरवर आपल्या आजोबांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर एक भावनिक संदेशही पमन यांनी लिहिला आहे. त्याचबरोबर आमरिक यांना रविवारी करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांचा आता मृत्यू झाला आहे, अशी माहितीही पमन यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज