अ‍ॅपशहर

भारत-पाक हॉकीचा इतिहास गमावला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी लढती म्हणजे चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. पण आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनसाठी (एफआयएच) मात्र या लढतींचे फारसे महत्त्व नसावे. त्यामुळेच या संघटनेने या लढतींच्या इतिहासाचा मोठा हिस्सा चक्क गमावला आहे.

Maharashtra Times 25 Oct 2016, 5:00 am
वृत्तसंस्था, कुआनतान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fih throws major part of indo pak hockey history into dustbin
भारत-पाक हॉकीचा इतिहास गमावला


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी लढती म्हणजे चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. पण आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनसाठी (एफआयएच) मात्र या लढतींचे फारसे महत्त्व नसावे. त्यामुळेच या संघटनेने या लढतींच्या इतिहासाचा मोठा हिस्सा चक्क गमावला आहे.

या दोन देशांतील लढतींना प्रेक्षकांनी नेहमीच मोठा पाठिंबा दर्शविला आहे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय फेडरेशननेही चांगली कमाई केली आहे. पण या दोन देशांतील सामन्यांचा इतिहास जपून ठेवण्याची काळजी फेडरेशनला घेता आलेली नाही.

भारत-पाकिस्तानातील हॉकीचा इतिहास १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमधील या दोन देशांतील लढतीपासून सुरू होतो. त्यानंतर हे दोन देश परस्परांशी तब्बल १६६ वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने त्यातील ५४ लढती जिंकल्या असून पाकिस्तानच्या खात्यात ८२ विजय जमा आहेत. ३० सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारताने काल पाकिस्तानविरुद्ध ३-२ असा मिळविलेला विजय हा भारताचा ५४वा विजय होता. या दोन देशातील हॉकीची परंपरा एवढी संपन्न असताना फेडरेशनला मात्र त्यात फारसा रस नसावा. त्यांनी या इतिहासातील बराचसा भाग हरवला आहे. फेडरेशनकडे असलेल्या माहिती संग्रहात या दोन देशांतील केवळ ४६ सामन्यांची माहिती आहे.

सध्या सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांनी उपलब्ध माहिती खेळाडूंना दिली, पण आतापर्यंत या दोन देशांत झालेल्या गोलची संख्या ३२१ असताना एफआयएचच्या मते केवळ ९८ गोलच या दोन देशांनी केलेले आहेत. एकूणच दोन्ही देशांच्या खेळाडूंनी केलेले उर्वरित २२३ गोल हे वाया गेले आहेत.

केवळ ४६ सामन्यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे भारताने त्यातील १९ सामने जिंकल्याची माहिती आहे तर पाकिस्तानने २५ सामन्यांत विजय मिळविल्याचे दिसते आहे. सहा दशके परस्परांशी खेळलेल्या या दोन देशांत केवळ ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज