अ‍ॅपशहर

‘अनेक खेळाडू निवृत्तीच्या विचारात’

लिओनेल मेस्सीच्या निवृत्तीनंतर सर्जिओ अॅग्युएरोसह अनेक अर्जेंटिनाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

Maharashtra Times 28 Jun 2016, 7:26 am
इस्ट रुदरफोर्ड : लिओनेल मेस्सीच्या निवृत्तीनंतर सर्जिओ अॅग्युएरोसह अनेक अर्जेंटिनाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. सर्जिओ म्हणाला, ‘मेस्सीसारखेच आता अनेक जण अर्जेंटिनाचा संघ सोडून जातील. यात माझाही समावेश आहे. अर्जेंटिनाकडून खेळत राहावे की निवृत्ती घ्यावी, याचा मी विचार करीत आहे.’ कोपा अमेरिकेत अंतिम लढतीत चिलीविरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये सर्जिओने गोल केला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम football players planning to retire
‘अनेक खेळाडू निवृत्तीच्या विचारात’


‘स्पर्धा सुरू असताना निवृत्तीचा विचार डोक्यात नव्हता; पण आता हा विचार सुरू झाला आहे. कारण या पराभवातून बाहेर पडणे अवघड आहे. पेनल्टी चुकल्यानंतर मेस्सी अगदीच निराश झाला. त्याला एवढे निराश मी कधीच पाहिले नव्हते. आम्ही सारेच खचलो आहोत. आता आम्हाला यातून बाहेर पडायला हवे. नशिब आमच्या बाजूने नव्हते, एवढेच म्हणेन.’ अर्जेंटिनाचा गोलकीपर सर्जिओ रोमेरोला आशा आहे की मेस्सीने त्याच्या निवृत्तीच्या विचाराचा फेरविचार करावा.
.....

माझ्या मतानुसार मेस्सी हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. संघ जिंकतो, तेव्हा तो सगळ्या खेळाडूंचा विजय असतो. संघ पराभूत झाला, तेव्हा तो सगळ्या खेळाडूंचा पराभव असतो. कोपा अमेरिकेच्या सुरुवातीला आमच्यावरही टीका झाली होती.

क्लाउडीओ ब्राव्हो, चीलीचा गोलकीपर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज