अ‍ॅपशहर

संदीप सिंग, योगेश्वर दत्त यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त या दोन खेळाडूंनी आज राजकीय मैदानात उडी घेतली. या दोन्ही खेळाडूंनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टी (भाजप) त पक्षप्रवेश केला. अकाली दलाचे आमदार बालकौर सिंग यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2019, 6:21 pm
नवी दिल्लीः भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त या दोन खेळाडूंनी आज राजकीय मैदानात उडी घेतली. या दोन्ही खेळाडूंनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टी (भाजप) त पक्षप्रवेश केला. अकाली दलाचे आमदार बालकौर सिंग यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dutt


हरियाणामधील योगेश्वर दत्त याने २०१२ साली ६० किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. २०१३ साली त्याचा 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सरकारकडून गौरव करण्यात आला होता. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये योगेश्वर दत्तने सुवर्ण कामगिरी करत 'गोल्ड मेडल' पटकावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनता आधीपासूनच आदर आहे. त्यांनी राबवलेल्या धोरणामुळे आपण खूपच प्रभावित झालो आहोत. म्हणूनच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे, असे योगेश्वर दत्त म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज