अ‍ॅपशहर

पबच्या बाहेर झाला वाद; मारहाणीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा मृत्यू

Chris Davidson Dies: पबच्या बाहेर झालेल्या मारहाणीत ऑस्ट्रेलियातील दिग्गज सर्फिंग स्टार क्रिस डेविडसन याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीस अटक केली आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2022, 10:38 am
पर्थ: ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सर्फिंग स्टार क्रिस डेविडसन (Chris Davidson) याचे सिडनीच्या उत्तरेतील एका पबच्या बाहेर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबच्या बाहेर क्रिसचे एका व्यक्तीसोबत वाद झाला त्यानंतर झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chris Davidson


क्रिस डेविडसनला १९९६ साली ऑस्ट्रेलियाच्या बेल्स बीच येथे वयाच्या १९व्या वर्षी रिप कर्ल प्रोमध्ये वाइल्डकार्ड द्वारे प्रवेश मिळाला होता. यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याने सलग दोन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये केली स्लेटरचा पराभव केला होता.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारताला मोठा धक्का; हार्दिक-हुड्डा संघाबाहेर, पाहा झालं तरी...

सिडनी येथे पबच्या बाहेर एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. हा वाद मारहाणीवर पोहोचला. मारहाणीत क्रिसला ठोसा लगावण्यात आला, यात त्याचा डोकं जमिनीवर आदळले आणि मृत्यू झाला. या व्यक्तीसोबत मी अनेक चांगल्या लढती खेळल्या. तो सर्वोत्तम असा सर्फर होता, असे मिस्टर स्लेटर म्हणाले.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूंसमोर घोषणाबाजी, या खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने संतापले चाहते

क्रिसच्या निधनामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी ज्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे त्याला जामीन देण्यास नकार दिला असून त्याला नोव्हेंबर महिन्यात कोर्टात हजर केले जाणार आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख