अ‍ॅपशहर

मुगुरुझाला विम्बल्डनचं जेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा ७-५, ६-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत प्रथमच विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. गार्बिनचं हे या वर्षातलं तिसरं ग्रॅण्डस्लॅम आहे. पाचवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणारी व्हीनस विल्यम्स अंतिम सामन्यात बाजी मारेल, असे बोलले जात होते.

Maharashtra Times 15 Jul 2017, 8:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbine muguruza beats venus williams in straight sets to win wimbledon title
मुगुरुझाला विम्बल्डनचं जेतेपद


स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा ७-५, ६-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत प्रथमच विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. गार्बिनचं हे या वर्षातलं तिसरं ग्रॅण्डस्लॅम आहे.

पाचवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणारी व्हीनस विल्यम्स अंतिम सामन्यात बाजी मारेल, असे बोलले जात होते. मात्र गार्बिनने व्हीनसचं आव्हान सहज मोडून काढत सर्वांनाच धक्का दिला.

विशेष म्हणजे स्पेनच्या महिला टेनिसपटूंना गेल्या २३ वर्षांपासून विम्बल्डनचं जेतेपद (महिला एकेरीत) हुलकावणी देत आलं आहे. २३ वर्षांपूर्वी स्पॅनिश काँचिता मार्टिंझने विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता गार्बिनच्या विजयाने जेतेपदाचा दुष्काळ संपला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज