मकरंद वायंगणकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या क्रिकेटर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मैदानाची देखभाल करणारे माळी रवी खैरे यांना २५ हजारांची मदत करण्यात आली. अभिजित झगिरी, सलील दातार, अमित गडकरी यांनी हा निधी खैरे यांना सोपविला. खैरे हे १९८६पासून माळी म्हणून काम करत असून वेंगसरकर एल्फ अकादमीत ते गेली १२ वर्षे ते देखभाल करत आहेत. या फाऊंडेशनमध्ये फ्रेड्युन डी वित्रे, शैलेश श्रीखंडे यांचेही योगदान आहे.
मदत क्रिकेट
मकरंद वायंगणकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या क्रिकेटर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मैदानाची देखभाल करणारे माळी रवी खैरे यांना २५ हजारांची मदत करण्यात ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2019, 4:00 am