अ‍ॅपशहर

शारदाश्रम व महात्मा गांधी विद्यामंदिर अजिंक्य

हिंद करंडक आंतर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुलांचे विजेतेपद शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यम शाळा आणि मुलीचे अजिंक्यपद महात्मा गांधी विद्यामंदिर संघाने पटकाविले. अभिषेक जाधवच्या चौफेर चढायामुळे शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यम शाळेने रा.फ.नाईक विद्यालय संघाचा ४७-४३ असा पराभव केला.

Maharashtra Times 14 Jan 2017, 4:00 am
मुंबई : हिंद करंडक आंतर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुलांचे विजेतेपद शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यम शाळा आणि मुलीचे अजिंक्यपद महात्मा गांधी विद्यामंदिर संघाने पटकाविले. अभिषेक जाधवच्या चौफेर चढायामुळे शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यम शाळेने रा.फ.नाईक विद्यालय संघाचा ४७-४३ असा पराभव केला. मुलींमध्ये महात्मा गांधी विद्या मंदिर संघाने लक्ष्मी विद्यालय-ठाणे संघावर ६१-४८ असा विजय मिळविताना करीना कामतेकरच्या अप्रतिम चढायाना विशेष दाद मिळाली. भारतीय क्रीडा मंदिर-वडाळा येथील हिंद करंडक कबड्डी स्पर्धेमधील तृतीय क्रमांक मुलांमध्ये डॉ. शिरोडकर हायस्कूल संघाने तर मुलींमध्ये रा.फ.नाईक विद्यालय-कोपरखैराणे संघाने मिळविला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hind karandak tournament
शारदाश्रम व महात्मा गांधी विद्यामंदिर अजिंक्य


सिद्धांत पाटील, गणेश शेळके, गणेश सनम यांच्या आक्रमक खेळामुळे रा.फ.नाईक विद्यालयाने शारदाश्रमवर पहिला लोण दिला. पण अभिषेक जाधवच्या चढाया थोपविण्यात नाईक विद्यालयाला अपयश आले. उत्तरार्धात, शारदाश्रम संघाच्या अभिषेक जाधवसह साहिल साठे, शशांक मोकल, दर्शन यलगार यांना छान सूर सापडला आणि विजयाचे पारडे शारदाश्रमच्या बाजूने ४७-४३ असे झुकविले. स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू अभिषेक जाधव ठरला.

करीना कामतेकर, लक्ष्मी कासारे यांच्या चढाईच्या खेळामुळे महात्मा गांधी विद्या मंदिर संघाने लक्ष्मी विद्यालय संघाविरुद्ध ६१-४८ अशी बाजी मारली आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटूचा पुरस्कार करीना कामतेकर हिने पटकाविला. अंतिम फेरीचा सामना क्रीडा उपसंचालक एन.बी.मोटे, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, आयडियल स्पोर्ट्स अकादमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, प्राचार्य डॉ.गो.वि.पारगावकर यांच्या उपस्थितीत झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज