अ‍ॅपशहर

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बीचा पराभव

चार सुपर सीरीज जिंकणारा किदाम्बी श्रीकांत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात चक्क पराभूत झाला आहे. अंतिम फेरीत एच. एस. प्रणॉयने त्याला पराभूत केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकलेल्या किदाम्बीच्या या पराभवाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Maharashtra Times 8 Nov 2017, 5:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hs prannoy beats kidambi srikanth to win national title
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बीचा पराभव


चार सुपर सीरीज जिंकणारा किदाम्बी श्रीकांत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात चक्क पराभूत झाला आहे. अंतिम फेरीत एच. एस. प्रणॉयने त्याला पराभूत केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकलेल्या किदाम्बीच्या या पराभवाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

प्रणॉयने श्रीकांतवर २१-१५, १६-२१, २१-७ अशी मात करत राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. प्रणॉयचं राष्ट्रीय स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. श्रीकांतने या स्पर्धेत सुरुवातीला आपला खास आक्रमक खेळ केला. पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने ३-० अशी आघाडीही घेतली होती. पण मध्यांतरानंतर खेळाचा रंग पालटला. पिछाडीवर असलेल्या प्रणॉयने १९-१३ अशी आघाडी घेतली. प्रणॉयने २१-१५ असा पहिला सेट खिशात घातला.

दुसऱ्या सेटसाठी श्रीकांतने प्रणॉयला चांगली टक्कर दिली. आपला अनुभव पणाला लावत श्रीकांतने खेळ फिरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काहीकाळ दोघंही बरोबरीत होते. पण नंतर प्रणॉयने आक्रमक होत तिसरा सेट २१-७ अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि चषकावरही आपले नाव कोरले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज