अ‍ॅपशहर

मी फुटबॉलचा देव नाही, सामान्य खेळाडू: मॅरेडोना

'आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत', असे वक्तव्य अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने केले आहे. आपण पुन्हा एकदा कोलकत्याला भेट देऊ अतिशय आनंदीत झालो आहोत असे म्हणत त्याने आपल्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मॅरेडोनाचे काल (रविवार) कोलकत्यात आगमन झाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2017, 9:41 pm
कोलकता: 'आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत', असे वक्तव्य अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने केले आहे. आपण पुन्हा एकदा कोलकत्याला भेट देऊ अतिशय आनंदीत झालो आहोत असे म्हणत त्याने आपल्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मॅरेडोनाचे काल (रविवार) कोलकत्यात आगमन झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i am not god of football maradona said after unveiling statue in kolkata
मी फुटबॉलचा देव नाही, सामान्य खेळाडू: मॅरेडोना


तब्बल ९ वर्षांनंतरचा मॅरेडोनाचा हा दुसरा दौरा. २००८मध्ये तो पहिल्यांदा दौऱ्यावर आला होता. मॅरेडोनाचा दुसरा दौरा पहिल्या दौऱ्याइतका भव्य नसला तरी उत्तर कोलकता क्लबमध्ये आपल्या आवडत्या फुटबॉलपटूची एक झलक पाहण्यासाठी सुमारे हजार चाहते गोळा झाले होते. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात मॅरेडोनाने ११ कर्करोग पीडितांना १०-१० हजार रुपयांचे धनादेश दिले. याबरोबरच त्याने एसी रुग्णवाहिकेलाही हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी क्लब पूर्णपणे गर्दीने फुलून गेला होता. यावेळी मॅरेडोनाला पाहण्यासाठी त्याचे चाहते आसपासच्या इमारतीच्या गच्चीवरही चढले होते.

मॅरेडोनाचे नाव दिलेल्या एका पार्कात उभारण्यात आलेल्या त्याच्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरणही मॅरेडोनाच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्याच्या हातात १९८६ चा विश्वचषक दाखवण्यात आला आहे. आपल्याच नावे असलेल्या पार्कात आपला पुतळा उभाल्याबद्दल मॅरेडोनाने समाधान व्यक्त केले.

मॅरेडोनाला १९ सप्टेंबरला भारतात यायचे होते. परंतु, त्याचा दौरा अनेकदा स्थगित झाला. बारासात येथे होणाऱ्या दिएगो विरुद्ध दादा प्रदर्शन सामन्यात मॅरेडोना दिग्गज क्रिकेटपटू सौरभ गांगुलीचा सामना करताना दिसणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज