मुंबई : वासुदेवानंद ट्रेड सेंटर, कुडाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर राज्य सांघिक महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने उपउपांत्य फेरीत आसामला ३-० असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या स्नेहा मोरेने आसामच्या हिमांकशी बैद्यला २५-२, २५-११ असे सहज पराभूत केले. तर दुसऱ्या एकेरीच्या लढतीत प्रीति खेडेकरने आसामच्या शर्मिला बोराला २५-०, २५-५ असे पराभूत केले. दुहेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या मैत्रेयी गोगटे / मीनल लेले जोडीने आसामच्या मुन्नी बेगम / बंदिनी बारुआ जोडीला २५-०, २५-५ असे हरवले. आंतर संस्था सांघिक पुरुष गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, एअर इंडिया, रिझर्व्ह बँक व जैन इरिगेशन संघानी आपापले साखळी गटातील सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर आंतर संस्था महिला सांघिक गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, आयुर्विमा महामंडळ, बी एस एन एल, जैन इरिगेशन या संघानीही उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्राच्या महिला उपांत्य फेरीत
वासुदेवानंद ट्रेड सेंटर, कुडाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर राज्य सांघिक महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने उपउपांत्य ...
30 21 Feb 2019, 4:00 am