अ‍ॅपशहर

आजपासून इंडिया ओपन टेटे

जगभरातील आघाडीच्या टेबलटेनिसपटूंची अनुपस्थिती आजपासून येथील त्यागराज स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सुरू होत असलेल्या इंडिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दिसून येणार आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 4:00 am
नवी दिल्ली : जगभरातील आघाडीच्या टेबलटेनिसपटूंची अनुपस्थिती आजपासून येथील त्यागराज स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सुरू होत असलेल्या इंडिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दिसून येणार आहे. दीड लाख अमेरिकन डॉलर इतकी बक्षिसांची रक्कम असलेल्या या स्पर्धेत अनेक प्रमुख खेळाडू खेळणार नाहीत. त्यात एकूण ८० खेळाडू भाग घेत असून पुरुषांत ५२ तर महिलांत २८ खेळाडूंचा सहभाग आहे. हंगेरीत गेल्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड टूर स्पर्धेला ३१६ खेळाडूंचा सहभाग लाभला होता पण इंडिया ओपनबद्दल फारशी आस्था खेळाडूंनी दाखविलेली नाही. भारताचा आघाडीचा खेळाडू सौम्यजीत घोषनेही याबाबत चिंता व्यक्त केली. भारताबद्दलची धारणा अजूनही बदललेली नाही, असे मत त्याने व्यक्त केले. गेल्या १० वर्षांत भारतातील स्थिती बरीच सुधारली असतानाही जागतिक स्तरावर भारताबद्दल अजूनही आपुलकीची भावना दिसत नाही, अशी खंत त्याने मांडली. भारतात आल्यानंतर आजारी पडू, अशी भीती परदेशी खेळाडूंना वाटत असल्याचेही सौम्यजीत म्हणाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india open table tennis
आजपासून इंडिया ओपन टेटे


भारताचा राष्ट्रीय विजेता शरथ कमल म्हणाला की, ही स्पर्धा स्थिरस्थावर होण्यासाठी काही काळ लागेल. त्यानंतरच खेळाडूंची संख्या वाढू शकते. या स्पर्धेत चीन व दक्षिण कोरियाचे खेळाडू सहभागी नसले तरी आव्हान कायम आहे. जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाचा जर्मन खेळाडू दिमित्री ओव्हचारोव्ह व आठवा मानांकित व्लादिमिर सॅमसोनोव्ह हे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. महिलांमध्ये हाँककाँगची दू होई केम खेळणार आहे तर भारताच्या मनिका बात्रा, मौमा दास, अहिका मुखर्जी व अंकिता दास यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. नुकतीच राष्ट्रीय विजेती ठरलेली मधुरिका पाटकरही स्पर्धेत खेळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज