अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरेंवर टीका करणारी बबिता रेल्वे अपघातावर म्हणाली...

काही दिवासंपूर्वी भारताची कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर बबिताने एक ट्विट केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2020, 8:42 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने टीका केली होती. ही टीका तिने पालघर येथील सामूहिक हत्या कांडावर केली होती. आता पुन्हा एकदा बबिताने एक ट्विट केले आहे. हे ट्विट महाराष्ट्रामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Babita-Phogat


महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या सामूहिक हत्या कांडावर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. कारण पालघरमध्ये दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या वादात बबिता फोगटने उडी घेतली होती. बबिताने, ठाकरे सरकार झोपा काढतंय का? अशी जहरी टीका केली होती. पालघर येथील मॉब लिंचिंगची घटनेबाबत बबीताने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये बबिताने म्हटले होते की, " महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे."

करोना'च्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडली. गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना एका मालगाडीनं चिरडल्यानं १६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवानं तिघांचे प्राण वाचले आहेत. बदनापूर-करमाड दरम्यान आज सकाळी सहा वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. या अपघााबद्दल देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी ट्विटरच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजलीही वाहिली आहे.


आता बबिताने महाराष्ट्रातील रेल्वे अपघातावर आपले मत व्यक्त केले आहे. बबिताने ट्विट करताना म्हटले आहे की, " महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे काही मजूरांचे रेल्वे अपघातामध्ये निधन झाल्याचे वृत्त मला समजले. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्याचबरोबर जे जखमी असतील ते लवकर बरे होवोत."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज