अ‍ॅपशहर

जोहोर कप हॉकीत भारताचा पराभव

जोहार बाहरू (मलेशिया) ः भारताने आठव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या फायनलमधील स्थान याआधीच निश्चित केले असले तरी शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत ब्रिटनने भारतावर ३-२ अशी मात केली. याआधीचे सलग चार सामने भारताने जिंकले आहेत.

Maharashtra Times 13 Oct 2018, 4:00 am
जोहार बाहरू (मलेशिया) ः भारताने आठव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या फायनलमधील स्थान याआधीच निश्चित केले असले तरी शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत ब्रिटनने भारतावर ३-२ अशी मात केली. याआधीचे सलग चार सामने भारताने जिंकले आहेत. भारताकडून विष्णूकांतसिंग आणि शैलेंद्र लाक्रा यांनी गोल केले. तर ब्रिटनकडून गोल केले ते कॅमेरुन गोल्डन, स्टुअर्ट रशमेरे, एडवर्ड वे यांनी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hockey


आज भारत वि. चीन

सोझॉ (चीन) ः तब्बल २१ वर्षांनंतर प्रथमच भारत विरुद्ध चीन असा फुटबॉल सामना आज, शनिवारी येथे रंगतो आहे. यजमान चीन सहाजिकच फेव्हरिट आहेत; पण त्यांची अलीकडील कामगिरी साजेशी झालेली नाही. भारतीय संघ प्रथमच चीनमध्ये आंतरराष्ट्रीय लढत खेळणार आहे. भारत-चीनमध्ये पार पडलेल्या १७ पैकी एकही लढत भारताला जिंकता आलेली नाही. तर चीनने १२ झुंजी जिंकल्या आहेत. या सामन्यात संदेश झिंगन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. १९९७मध्ये भारत-चीन ही नेहरू कपमधील लढत कोची येथे पार पडली होती.

विराट अव्वल

दुबई : भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमधील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्याच्या खात्यात ९३६ गुण आहेत. दरम्यान, या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा भारताचा रवींद्र जाडेजा गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजी क्रमवारीत त्याच्या खात्यात ८१८, तर अष्टपैलू क्रमवारीत ४१८ गुण आहेत.

जोकोविच उपांत्य फेरीत

शांघाय : सर्बियाचा चौदा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने उपांत्यपूर्व सामन्यात केविन अँडरसनवर ७-६ (७-१), ६-३ अशी मात केली. उपांत्य फेरीत ३१ वर्षीय जोकोविचचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी होईल. २१ वर्षीय झ्वेरेवने उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या काइल एडमंडविरुद्ध ६-४, ६-४ असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठल्यामुळे झ्वेरेवचा पुढील महिन्यात होणाऱ्या एटीपी टूर फायनल्स स्पर्धेतील प्रवेशही निश्चित झाला आहे.

महिला संघ पाचवा

दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-२० क्रिकेट सांघिक क्रमवारीमध्ये भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. आयसीसीने या वर्षी महिला टी-२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतंत्रपणे टी-२० क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ या क्रमवारीत अग्रस्थानी असून त्यांच्या खात्यात २८० गुण आहेत. भारतीय महिला संघाच्या खात्यात २४९ गुण आहेत.

कॉन्स्टंटाइनना विश्वास

सुझोऊ (चीन) : भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल २१ वर्षांनी शनिवारी, १३ ऑक्टोबर रोजी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रंगणार आहे. या सामन्यात चीनचे पारडे जड असले, तरी भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टंटाइन यांनी व्यक्त केला. येथील वातावरण फुटबॉल सामन्यासाठी उत्कृष्ट आहे आणि एशियन कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीचा हा सामना संघासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे कॉन्स्टंटाइन म्हणाले.

इंडियन रशचा विजय

मुंबई ः टायसन पटेल याने केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर इंडियन रश सॉकर क्लबने फुटबॉल क्लब मुंबईकर्सचा ३-० असा धुव्वा उडवला. एआयएफएफतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षांखालील वाय लीग महाराष्ट्र उपउपांत्यपूर्व फेरीच्या या स्पर्धेत टायसन पटेलने अखेरच्या क्षणी झळकावलेल्या दोन गोलमुळे इंडियन रशला मोठ्या फरकाने विजय नोंदवता आला. कूपरेज मैदानावर ही लढत पार पडली. निकाल : इंडियन रश सॉकर क्लब ३ (जोशिया नरोन्हा ४४व्या मिनिटाला, टायसन पटेल ८८व्या आणि ९०+३व्या मिनिटाला) विजयी वि. एफसी मुंबईकर्स ०.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज