अ‍ॅपशहर

गोवा संघाला ११ कोटींचा दंड

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमधील फुटबॉल क्लब गोवा संघावर स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली असून या संघावर ११ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे तर त्यांचे सहमालक श्रीनिवास डेम्पो व दत्तराज साळगावकर यांना अनुक्रमे दोन व तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra Times 6 May 2016, 12:45 am
नवी दिल्ली : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमधील फुटबॉल क्लब गोवा संघावर स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली असून या संघावर ११ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे तर त्यांचे सहमालक श्रीनिवास डेम्पो व दत्तराज साळगावकर यांना अनुक्रमे दोन व तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम isl levies harsh penalties on fc goa
गोवा संघाला ११ कोटींचा दंड


आयएसएलच्या दुसऱ्या हंगामात गोव्यात झालेल्या अंतिम सामन्यादरम्यान गोवा संघाचे अधिकारी व चेन्नईन एफसीचा ब्राझिलियन खेळाडू एलानो ब्लमर यांच्यात झालेल्या वादानंतर त्याची चौकशी होऊन ही कारवाई करण्यात आली. आयएसएलच्या नियामक आयोगाने मुंबईत झालेल्या सुनावणीनंतर या कारवाईचा निर्णय घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज