सम्मेद, केतनकडे
संयुक्त आघाडी
पुणे : कोल्हापूरचा सम्मेद शेटे आणि मुंबईचा केतन बोरीचा यांनी पीवायसीतर्फे आयोजित निमंत्रित बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्त आघाडी घेतली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या पटावर सम्मेदने मुंबईच्या वेदान्त पानेसरवर मात केली, तर तिसऱ्या पटावर मुंबईच्या केतन बोरीचाने मुंबईच्या संजीव नायरवर विजय नोंदविला.
सहाव्या फेरीचे निकाल : वेदान्त पानेसर - ४.५ गुण (मुंबई) पराभूत वि. सम्मेद शेटे - ५ (कोल्हापूर); अनिरुद्ध देशपांडे - ४.५ (पुणे) बरोबरी वि. सुयोग वाघ - ४.५ (अहमदनगर); केतन बोरीचा - ५ (मुंबई) वि. वि. संजीव नायर - ३.५ (मुंबई); रणवीर मोहीते - ४ (पुणे) बरोबरी वि. शंतनू भांबुरे - ४ (पुणे); प्रणव शेट्टी - ३ (मुंबई) पराभूत वि. विक्रमादित्य कुलकर्णी - ४ (मुंबई); समीर काठमाळे - ४ (सांगली) वि. वि. विकास शर्मा - ३ (पुणे); कशिश जैन - ३.५ (पुणे) बरोबरी वि. निखिल दीक्षित - ३.५ (पुणे); जीत शहा - ३.५ (मुंबई) बरोबरी वि. शिव शोमी - ३.५ (मुंबई); सोहम दातार - ४ (पुणे) वि. वि. स्नेहल भोसले - ३ (मुंबई); सलोनी सापळे - ३.५(पुणे) बरोबरी वि. ओम कदम - ३.५ (मुंबई).