अ‍ॅपशहर

महात्मा गांधी व नाईक विद्यालयाला हिंद करंडक

शालेय मुलींच्या गटात वांद्र्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिरने राणी लक्ष्मीबाई हिद करंडक तर शालेय मुले गटात कोपरखैराणेच्या रा.फ.नाईक विद्यालयाने टोपीवाला हिंद करंडक पटकाविला.

Maharashtra Times 15 Jan 2017, 1:26 am
मुंबई : शालेय मुलींच्या गटात वांद्र्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिरने राणी लक्ष्मीबाई हिद करंडक तर शालेय मुले गटात कोपरखैराणेच्या रा.फ.नाईक विद्यालयाने टोपीवाला हिंद करंडक पटकाविला. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विध्यामाने झालेल्या ७४ व्या आंतर शालेय हिंद करंडक स्पर्धेत कबड्डी, खो खो, लंगडी या तीन क्रीडा प्रकारात एकंदर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शालेय संघाला प्रतिष्ठेचा हिंद करंडक बहाल करण्यात आला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात मुंबई-ठाणे परिसरातील एकूण शालेय १२४ संघांच्या सहभागाने झालेल्या हिंद करंडक स्पर्धेत मुलींमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिरने सर्वाधिक १३ गुण तर मुलांमध्ये रा.फ.नाईक विद्यालयाने सर्वाधिक १० गुण घेतले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabaddi
महात्मा गांधी व नाईक विद्यालयाला हिंद करंडक


हिंद करंडक शालेय मुली गटात महात्मा गांधी विद्यामंदिरने कबड्डी व लंगडीचे अंतिम विजेतेपद आणि खोखोचे अंतिम उपविजेतेपद पटकावून १३ गुणांची नोंद केली. कबड्डीमध्ये अंतिम फेरीत महात्मा गांधी विद्यामंदिरने लक्ष्मी विद्यालय-ठाणे संघावर ६१-४८ तर असा विजय मिळविला तर लंगडीमध्ये अंतिम फेरीत श्रावणी चव्हाणच्या उत्कृष्ट संरक्षणामुळे डॉ.शिरोडकर हायस्कूलचा ९ गुणांनी पराभव केला. खोखोची अंतिम फेरी रा.फ.नाईक विद्यालयाने पूजा फरगडेच्या अष्टपैलू खेळामुळे महात्मा गांधी विद्यामंदिरला हरविले.

शालेय मुलांचा टोपीवाला हिंद करंडक पटकाविताना कोपरखैरणेच्या रा.फ.नाईक विद्यालयाने खोखोचे अजिंक्यपद व कबड्डीचे उपविजेतेपद पटकाविले. गिरीश काळे व अभिषेक शिंदेच्या आक्रमक खेळामुळे खोखोच्या अंतिम फेरीत नाईक विद्यालयाने गांधी विद्यामंदिरचा डावाने पराभव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज