अ‍ॅपशहर

अमरहिंद, बंड्या मारुती विजयी

यंग भारत सेवा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रमाकांत राठीवडेकर चषक प्रथम श्रेणी स्थानिक कबड्डी स्पर्धेत अमरहिंद, बंड्या मारुती, अंकुर स्पोर्टस यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Maharashtra Times 25 Nov 2016, 12:33 am
मुंबई : यंग भारत सेवा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रमाकांत राठीवडेकर चषक प्रथम श्रेणी स्थानिक कबड्डी स्पर्धेत अमरहिंद, बंड्या मारुती, अंकुर स्पोर्टस यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabadi
अमरहिंद, बंड्या मारुती विजयी


प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी उद्यानातील सूर्यकांत बिडू क्रीडानगरीत मॅटवर झालेल्या सामन्यात दादरच्या अमरहिंदने दादरच्याच विजय बजरंगचा ३१-११ असा पाडाव केला. अमरहिंदकडून अनिकेत पेवेकर तर विजय बजरंगकडून अनिकेत रामाणे छान खेळले. दुसऱ्या सामन्यात बंड्या मारुतीने पिंपळेश्वरचा ४६-२१ असा पराभव केला.

सचिन पाताडे, सागर पाटील बंड्या मारुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पिंपळेश्वरकडून संकल्प पवारने चमक दाखविली. अंकुरने विजय

नवनाथवर ३३-२४ अशी मात केली. सुमित साहिलच्या सावध चढाया व दीपक झझोटचा अष्टपैलू खेळ या विजयात महत्वाचा ठरला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज