अ‍ॅपशहर

कर्नाटकाच्या श्रीधरने पटकावले विजेतेपद

पुणे : कर्नाटकाच्या श्रीधर सावनूर याने पुणे ते बारामीत अशा १२२ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय सायकल शर्यतीचे विजेतेपद पटकावले.

Maharashtra Times 23 Jul 2017, 4:00 am
सायकल शर्यत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम karnatak shreedhar won the pune cycle race
कर्नाटकाच्या श्रीधरने पटकावले विजेतेपद

पुणे : कर्नाटकाच्या श्रीधर सावनूर याने पुणे ते बारामीत अशा १२२ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय सायकल शर्यतीचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शनिवारवाड्यापासून सुरुवात झाली. हडपसरपर्यंतचे अंतर हे स्पर्धा विरहित होते. श्रीधर याने ही शर्यत २ तास ४० मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावले. ‘घाटाचा राजा’ हा किताबही श्रीधरनेच पटकावला. त्याने दिवे घाट ९ मिनिटे २७ सेकंदांत पार केला. कर्नाटकाच्या मल्लाप्पा मूर्तान्नावरने दुसरा, एससीआरच्या जिथा रामगटने तिसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या स्पर्धेत केरळच्या सायोना पो हिने पहिला क्रमांक पटकावला. पुण्याच्या पूजा डूनोले हिने दुसरा, तर पुण्याच्याच प्रणिता सोमणने तिसरा क्रमांक मिळविला.
पुरुष गटातील (एमटीबी) सासवड ते बारामती या ८५ किलोमीटर अंतराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामतीचा विनीत सावंतने २ तास ४० मिनिटे ३० सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला. नगरच्या श्रीनिवास लोंढेने दुसरा, तर नगरच्याच संकल्प थोरातने तिसरा क्रमांक मिळवला. महिलांच्या राज्यस्तरीय माळेगाव ते बारामती या १५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत नाशिकच्या अंजू घुलेने प्रथम, पुण्याच्या प्रिया दोडकेने दुसरा, तर नाशिकच्या सिया ललवाणीने तिसरा क्रमांक मिळविला. मुलांच्या गटातील ८५ किलोमीटर अंतराच्या राज्यस्तरीय शर्यतीस सांगलीच्या मच्छिंद्र पवारने पहिला, नगरच्या विकास रोठेने दुसरा, तर कोल्हापूरच्या प्रतीक पाटीलने तिसरा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अशोक प्रभुणे, द. रा. उंडे, भार्गवी चिरमुले आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धेत एकूण २ लाख १८ हजार रुपयांची, तर राज्यस्तरीय स्पर्धेत १ लाख ४८ हजार ५०० रुपयांची पारितोषिके दिली गेली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज