अ‍ॅपशहर

नरसिंगला न्याय द्या !

ऑलिम्पिक कुस्तीगीर नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेने (नाडा) जाहीर केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्याची दखल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनेही घेतली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नरसिंगविरोधात हा कट रचला जात असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Times 26 Jul 2016, 10:34 pm
पुणे : ऑलिम्पिक कुस्तीगीर नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेने (नाडा) जाहीर केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्याची दखल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनेही घेतली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नरसिंगविरोधात हा कट रचला जात असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra olympic association letter
नरसिंगला न्याय द्या !


महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या आणि तीनवेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या नरसिंगला ऑलिम्पिकमध्ये जाण्यापासून रोखण्याचा हा कट आहे. नरसिंगला ऑलिम्पिकला रवाना होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना ‘नाडा’ने हे बेजबाबदार पाऊल कसे काय उचलले ? भारताच्या ऑलिम्पिकमधील संभाव्य पदकविजेत्याची कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी हा काहींचा प्रयत्न सुरू आहे. अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सद्यस्थितीत ‘नाडा’ने ही घोषणा कशी काय केली ? न्यायालयात खटला चालू असताना ही चाचणी का झाली नाही ? नरसिंगला दोषी मानून त्याच्या जागी सुशीलला संघात स्थान देण्याचा हा प्रयत्न आहे का ?

नरसिंग यादवसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संघर्ष करेल. एका तरुण खेळाडूला या परिस्थितीतून जावे लागते हे देशासाठी लाजिरवाणे आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना उत्तेजकसेवनाला थारा देत नाही पण या प्रकरणात नरसिंगला रोखण्यासाठी हा कट रचला जात असल्याची ऑलिम्पिक संघटनेची भावना आहे. आम्ही सरकारला कळकळीची विनंती करतो आहोत की, त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि नरसिंगला न्याय द्यावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज