अ‍ॅपशहर

सत्तासंघर्षानंतर आता कुस्ती रंगणार! शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. आता राज्यातील कुस्ती संघटनेतील राजकारणावरून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2022, 11:39 am
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना एकच धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेता असून या संघटनेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad-pawar
शरद पवार


भारतीय कुस्ती महासंघाची दिल्लीत झालेल्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून काही दिवसात हंगामी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा संघटना आणि मल्लांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे कळते. आजी आणि माजी मल्लांकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. या वर्षी देखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.

वाचा- पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला 'इंद्रानगरचा गुंड'

याच बरोबर गेल्या काही वर्षांपासून महासंघाने राज्य परिषदेला १५ आणि २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले होते. पण ही विनंती परिषदने फेटाळण्यात आली होती. त्यामुळे देखील महासंघाची नाराजी होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार बृजभूषण आहेत. काही दिवसांपूर्वी बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. यामुळेच आता महासंघाच्या या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

वाचा- जाणून घ्या कोण आहे गेरार्ड पिक; शकीराने महिलेसोबत रंगेहात पकडले आणि...

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपने दबाव तंत्राचा वापर करून ही कारवाई केल्याचा आरोप केलाय.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख