अ‍ॅपशहर

मेरी सहाव्या सुवर्णपदकाकडे

पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकणारी भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.

PTI 23 Nov 2018, 12:44 am
जागतिक बॉक्सिंगमध्ये उत्तर कोरियाच्या खेळाडूला नमवून अंतिम फेरीत धडक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mary to the sixth gold medal
मेरी सहाव्या सुवर्णपदकाकडे


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकणारी भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून या स्पर्धेच्या इतिहासात तिने स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.

याआधी, आयर्लंडची खेळाडू कॅटी टेलरसह मेरीची बरोबरी झाली होती. मेरीच्या खात्यात जागतिक स्पर्धेतील पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके होते. तर कॅटीच्या खात्यात पाच सुवर्ण आणि एक ब्राँझ अशी सहा पदके होती. पण मेरीने उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले आणखी एक पदक निश्चित केल्यामुळे ती जागतिक स्तरावर सर्वाधिक पदके जिंकणारी खेळाडू ठरली आहे. आता फक्त प्रश्न आहे तो ती कोणते पदक जिंकणार हा. जर तिने शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले तर ती पुरुषांशीही बरोबरी करणार आहे. क्युबाचा फेलिक्स सॅव्हन याच्याशी ती सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी खेळाडू म्हणून बरोबरी करणार आहे. सॅव्हनने तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्या खात्यात सहा सुवर्ण आणि एक रौप्य आहे.

मेरीने आपल्या उपांत्य लढतीतील विजयानंतर प्रतिक्रिया दिली की, 'आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मी उत्तर कोरियाच्या याच खेळाडूला पराभूत केले होते. तेव्हाही ती एकतर्फी लढत झाली होती. त्यातून ती काही शिकली असेल. मलाही खूप शिकायला मिळाले आणि मला आनंद वाटतो की मी अंतिम फेरीत पोहोचले आहे. माझी प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यापेक्षा उंच आणि तगडीही होती. पण रिंगमध्ये उतरल्यानंतर मी पर्वा करत नाही की प्रतिस्पर्धी खेळाडू उंच आहे की बलवान आहे.'

आता अंतिम फेरीत मेरीची झुंज युक्रेनच्या हॅना ओखोताशी होईल. पोलंडमध्ये यावर्षी झालेल्या स्पर्धेत मेरीने तिला पराभूत केले होते. मेरी म्हणाली की, मी त्या लढतीचा पुन्हा अभ्यास करणार आहे आणि त्यानुसार माझे डावपेच तयार करेन. मी तिला पुन्हा पराभूत करणार.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज