अ‍ॅपशहर

हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

रुपिंदर आणि रमणदीप यांनी केवळ एका मिनिटाच्या कालावधीत केलेल्या दणदणीत दोन गोलांच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला ३-२ अशा फरकाने पराभवाची धूळ चारली. या विजयामुळे ७ गुणांसह भारताने गुणतालिकेतील सर्वात वरचे स्थान पटकावले आहे.

Maharashtra Times 23 Oct 2016, 8:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कुआंटन ( मलेशिया)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mens hockey asian champions trophy india vs pakistan
हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय


रुपिंदर आणि रमणदीप यांनी केवळ एका मिनिटाच्या कालावधीत केलेल्या दणदणीत दोन गोलांच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला ३-२ अशा फरकाने पराभवाची धूळ चारली. या विजयामुळे ७ गुणांसह भारताने गुणतालिकेतील सर्वात वरचे स्थान पटकावले आहे.

आशियाई चॅम्पियन ट्रॉफीचा हा सातवा आणि भारताचा तिसरा मुकाबला होता. या सामन्याचा तिसरा क्वार्टर अतिशय अटीतटीचा आणि चित्तथरारक झाला. याच क्वार्टरमध्ये भारताने दोन, तर पाकिस्तानने एक गोल केला. भारताकडून प्रदीप, रुपिंदर आणि रमणदीप यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले. प्रदीप, रुपिंदर आणि रमणदीप सिंग यांनी केलेल्या गोलमुळे भारताला पाकिस्तानला सहज नमवता आले.

आजच्या या थराराक लढतीत एका मिनिटाच्या कालावधीत रुपिंदर आणि रमणदीप यांनी दोन गोलची कमाई करत पिछाडीवर असलेल्या भारताला विजयाकडे नेले.

सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करणे जमले नाही. यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारताने पाकिस्तानवर १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा वरचष्मा असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच, विश्रांतीनंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. पाकिस्तानसाठी हा गोल मोहम्मद रिजवानने केला. यानंतर काही मिनिटांमध्येच पाकिस्तानने भारताविरुद्ध आपले आक्रमण तीव्र करत आणखी एक गोल केला आणि २-१ अशी आघाडी मिळवली.



पाकने आघाडी मिळवल्यानंतर जराही दबावात न येता भारताने आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या ४३ व्या आणि ४४ व्या मिनिटांमध्ये भारताने सलग दोन गोल डागत सामन्यात ३-२ अशी आघाडी मिळवली. यानंतर मात्र भारताने पाकिस्तानला कोणतीही संधी दिली नाही. अशा प्रकारे आक्रमक आणि सुंदर खेळ दाखवत भारताने हा सामना आपल्या खिशात घातला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज