अ‍ॅपशहर

महाराष्ट्र उपांत्य फेरीत

भारतीय रेल्वे विरुद्ध आंध्र प्रदेश तर महाराष्ट्र विरुद्ध हरयाणा यांच्यात ६४व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य झुंजी रंगणार आहेत.

Maharashtra Times 30 Nov 2016, 4:00 am
मुंबईः भारतीय रेल्वे विरुद्ध आंध्र प्रदेश तर महाराष्ट्र विरुद्ध हरयाणा यांच्यात ६४व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य झुंजी रंगणार आहेत. बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुल-पाटणा येथे सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्य लढतीत भारतीय रेल्वने पंजाबला ४५-३० असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या उपउपांत्य सामन्यात आंध्र प्रदेशने उत्तर प्रदेशला २७-२० असे नमवित दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने चंडीगढवर ३६-१९असा विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम national womesns kabaddi championship patna
महाराष्ट्र उपांत्य फेरीत

मध्यंताराला १३-०९ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने नंतर मात्र जोशपूर्ण खेळ करीत हा मोठा विजय मिळविला. पूर्वार्धात खेळाडूंचा अंदाज घेत सावध खेळ करीत महाराष्ट्राने अवघी ४गुणांची आघाडी घेतली होती. नंतर मात्र त्यांनी मुसंडी मारली. सायली जाधवने चंडीगडवर दोन लोन देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तिला चढाईत अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर यांची छान साथ लाभली, तर सुवर्णा बारटक्के, दीपिका जोसेफ, पूजा पवार यांनी पकडीची छान साथ दिली. हरयाणाने हिमाचल प्रदेशला ३२-२४ असे नमवून उपांत्य फेरी गाठली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज