अ‍ॅपशहर

गुड न्यूज: नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकाची दावेदारी, Video

Neeraj Chopra: अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा अ‍ॅथलिट नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2022, 8:08 am
ओरेगॉन: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा(Neeraj Chopra)ने अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (world athletic championship) शुक्रवारी आनंदाची बातमी दिली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भाला फेकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची नीरजची पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Neeraj Chopra



गेल्या वर्षी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या स्टार खेळाडूने आता जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत देखील कमाल करून दाखवली. पुरुषांच्या भालाफेकमध्ये एकूण ३४ खेळाडू होते. या खेळाडूंना दोन गटात विभागण्यात आले होते. दोन्ही गटातून सर्वोत्तम १२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड केली गेली. आता उद्या २४ जुलै, रविवारी अंतिम फेरी होणार आहे.

वाचा-टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणाला जमले नाही; पहिली मॅच, पहिली ओव्हर आणि झाला

२४ वर्षीय नीरज चोप्राने ग्रुप ए मधील पात्रता फेरीत त्याच्या करिअरमधील तिसरा सर्वोत्तम थ्रो केला आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. नीरज सोबत चेक प्रजासत्ताकचा जाकुब वादलेज्चने पहिल्याच प्रयत्नात ८५.२३ मीटर भाला फेकला आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. भालाफेकमध्ये नीरज चोप्रासह भारताचा रोहित यादव याचा देखील सहभाग आहे. तो ग्रुप बी मधून स्वत:ची दावेदारी सिद्ध करेल.

वाचा-क्रिकेट इतिहासात जगातील फक्त एका संघाने असं केलं; शिखरच्या निमित्ताने टीम इंडिया करणार

नीरजची सर्वोत्तम कामगिरी ही ८९.९४ मीटर इतकी आहे. स्पर्धेच्या गेल्या हंगामात नीरजवर शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे त्याला भाग घेता आला नव्हता. तर २०१७च्या हंगामात तो अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. तेव्हा त्याने ८२.२६ मीटर थ्रो केला होता.

नीरज चोप्राने या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने दोन वेळा वैयक्ती कामगिरी सुधारणा केली आहे. १४ जून रोजी फिनलँड येथे झालेल्या पावो नुर्मी स्पर्धेत त्याने ८९.३० त्यानंतर ३० जून रोजी स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर थ्रो केला होता. अर्थात इतकी चांगली कामगिरी करून त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तेवहा एडरसन पीटर्सने ९०.३१ सह सुवर्णपदक जिंकले होते.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज