अ‍ॅपशहर

नितीश कुलकर्णी आयर्न मॅनचा मानकरी

ऑस्ट्रेलियातील कडक उन्ह, थंड पाण्यातील जलतरण आणि समुद्रातील जेलीफीश व शार्क माश्यांचा सामाना करत राजारामपुरी येथील नितीश हेमंत कुलकर्णी यांनी आयर्न मॅन किताब पटकावला. ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत नितीशने ११ तास ४१ मिनिटाचा अवधी घेत कोल्हापूरचा नावलौकिमध्ये भर घातली.

Maharashtra Times 11 Dec 2018, 12:06 pm
कोल्हापूर टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitish-kulkarni


ऑस्ट्रेलियातील कडक उन्ह, थंड पाण्यातील जलतरण आणि समुद्रातील जेलीफीश व शार्क माश्यांचा सामाना करत राजारामपुरी येथील नितीश हेमंत कुलकर्णी यांनी आयर्न मॅन किताब पटकावला. ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत नितीशने ११ तास ४१ मिनिटाचा अवधी घेत कोल्हापूरचा नावलौकिमध्ये भर घातली.

आयर्न मॅन किताबाबसाठी चार किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे अशा शरीरिक व मानसिक कणखरता पाहणारी स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियात पार पडली. स्पर्धेसाठी जगभरातील सुमारे २,३०० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत कोल्हापूरचा नितीश प्रमुख आकर्षण ठरला. अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेल्या नितीशने गेल्या वर्षभरापासून स्पर्धेची तयारी सुरू केली होती. चार किमी जलतरण करताना त्याला समुद्रातील अतिशय थंड पाण्यातून जेलीफीश व शार्क माशांचा अडथळा पार केला. त्यानंतर सायकलिंग या आवडत्या प्रकारातील १८० किमीचे अंतर अत्यंत कमी वेळत पूर्ण केले. त्यानंतर ३४ अंश सेल्शियस तापमानात ४२ किमी धावत संपूर्ण स्पर्धा ११ तास ४१ मिनिटात पार केली. १७ तासात स्पर्धा पूर्ण करण्याची आवश्यकता असताना नितीशने त्यापेक्षा सहा तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण करुन आयर्न मॅन किताब पटकावला.

गेल्या काही वर्षापासून आयर्न मॅन किताबासाठी कोल्हापूर येथील युवक प्रयत्नशील आहेत. २०१५ मध्ये झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत आकाश कोरगावकरने पहिला किताब पटकावला होता. त्यानंतर कोल्हापूरात हीच परंपरा नितीशने कायम ठेवली आहे. नितीशला प्रशिक्षक धैर्यशील चव्हाण, विजय मांगले, पंकज रावळू यांचे मार्गदर्शन तर वैशाली कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कडक उन्हाळा असताना स्पर्धा पुढे जाताना दमट व थंड अशा प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. त्यामुळे चांगलीच दमछाक झाली, तरी ११ तासात शर्यत पूर्ण करुन आयर्न मॅन किताब मिळवल्याचे समाधान आहे.

नितीश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज