मुंबई : अमरहिंद मंडळ, दादरने ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ओम ज्ञानदीपने संस्कृती प्रतिष्ठानवर २७-२६ असा १ गुणाने निसटता विजय संपादन केला. त्यांच्या शुभम मुळेकर, पवन बारये यांनी प्रेक्षकांची जिंकली. विजय क्लबने सिद्धप्रभा फौंडेशनवर विजय संपादन करत उपउपांत्य फेरी गाठली. पिंपळेश्वर क्रीडा मंडळाने एस एस जी फौंडेशनचा ३२-२८ असा ४ गुणांनी पराभव केला. तर यंग विजयने जय भारत संघाचा ३२-२३ असा ९ गुणांनी धुव्वा उडवला. इतर सामन्यात विजय बजरंगने वीर संताजी वर ४१-२२, विकास क्रीडा मंडळाने जय दत्तगुरूवर ४१-२३, यंग प्रभादेवीने गोल्फादेवी वर ३०-२२ तर वीर बजरंगने अशोक मंडळावर ४८-१६ अश्या विजयांची नोंद केली.
ओम ज्ञानदीप उपउपांत्य फेरीत
अमरहिंद मंडळ, दादरने ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ओम ज्ञानदीपने संस्कृती प्रतिष्ठानवर २७-२६ असा १ गुणाने निसटता विजय संपादन केला.
Maharashtra Times 19 Jan 2017, 4:00 am