अ‍ॅपशहर

मॅच पॉईंट वाचवत पेस-राजाची बाजी

लिअँडर पेस व पुरव राजा बुजूर्ग जोडीने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोन अनुभवी टेनिसपटूंचा विजय यासाठीदेखील महत्त्वाची आहे; कारण या दोघांनी मॅच पॉईंट वाचवत ब्रुनो सॉरेस (ब्राझिल) आणि जॅमी मरे (ब्रिटन) या पाचव्या सीडेड जोडीवर ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) अशी मात केली.

Maharashtra Times 21 Jan 2018, 5:59 am
मेलबर्नः लिअँडर पेस व पुरव राजा बुजूर्ग जोडीने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोन अनुभवी टेनिसपटूंचा विजय यासाठीदेखील महत्त्वाची आहे; कारण या दोघांनी मॅच पॉईंट वाचवत ब्रुनो सॉरेस (ब्राझिल) आणि जॅमी मरे (ब्रिटन) या पाचव्या सीडेड जोडीवर ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) अशी मात केली. जवळपास तीन तास हा सामना सुरू होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tennis


जागतिक दुहेरीच्या रँकिंगमध्ये डावखुरा जॅमी मरे नवव्या, तर सॉरेस दहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या मोसमात त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरीदेखील केली आहे; पण पुरव राजा याने नेट जवळ जबरदस्त खेळ करत मरे व सॉरेस यांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. पहिल्या दोन्ही सेटमध्ये बघायला मिळालेली चुरस निर्णायक तिसऱ्या सेटमध्येही कायम होती. ही कोंडी ५-५ अशा बरोबरीपर्यंत कायम होती. या दरम्यान आघाडी घेणाऱ्या सॉरेस-मरे जोडीने मॅच पॉईंट मिळवला होता. एव्हाना नेट जवळ कौशल्यपूर्ण खेळ करणाऱ्या राजाने सर्व्हिसवरही गुण मिळवायलाही सुरुवात केली होती. राजानेच मरे-सॉरेसने मिळवलेला मॅच पॉईंट वाचवला; पण आपल्या दमदार सर्व्हिसने मॅच पॉईंट कमावलादेखील. यानंतर पेस-राजा जोडीने मागे वळून पाहिले नाही.

भारतीय जोडीने सामना खिशात टाकला तोदेखील राजाच्या अफलातून बॅकहँड रिटर्नवरच.

दृष्टिक्षेप

१)बिनसीडेड पेस व राजा या जोडीने पाचव्या सीडेड ब्रुनो सॉरेस-जॅमी मरे यांच्यावर ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) अशी मात केली.

२)पेस व राजा यांनी गेल्या मोसमात चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धांमध्ये दुहेरीची दोन जेतेपदे पटकावली. या दोघांची एकत्र खेळताना ही दुसरीच ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.

३)२०१७च्या मोसमातील अमेरिकन ओपनमध्ये पेस-राजा यांना दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज