अ‍ॅपशहर

पाकिस्तानला कबड्डी वर्ल्डकपमध्ये 'नो एन्ट्री'

भारतात या आठवड्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकप कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार नाही. भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघानं पाकिस्तान संघाला या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं आहे.

Maharashtra Times 5 Oct 2016, 3:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan barred from kabaddi world cup in india
पाकिस्तानला कबड्डी वर्ल्डकपमध्ये 'नो एन्ट्री'

भारतात या आठवड्यात सुरू होणाऱ्या वर्ल्डकप कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार नाही. भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघानं पाकिस्तान संघाला या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं आहे.

महासंघाच्या या निर्णयावर पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यासोबत भेदभाव केला जात आहे. दोन्ही देशांच्या संबंधांतील तणावामुळं हा निर्णय घेतला असेल तर, दोन्ही देशांना स्पर्धेतून बाद करायला हवं होतं, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

पाकिस्तानसोबत खेळण्याची ही योग्य वेळ नाही. त्यामुळंच त्यांना स्पर्धेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे प्रमुख देवराज चतुर्वेदी यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज