अ‍ॅपशहर

पदक पटकावत इतिहास रचणाऱ्या सुहास यांना पंतप्रधान मोदींचा फोन; म्हणाले...

वडिलांच्या मृत्यूनंतर नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकारी बनल्यानंतर त्यांना व्यावसायिक बॅडमिंटनपटू म्हणूनही विविध जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. आणि आता तर त्यांनी भारतासाठी पदक जिंकण्याचीही किमया साधली आहे...

Lipi 5 Sep 2021, 3:10 pm
Tokyo Paralympics 2021 : नवी दिल्ली : भारताचे पॅरा बॅडमिंटन स्टार आणि नोएडाचे डीएम सुहास एल. यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वांनीच त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा केलं ट्विट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi spoke to noida dm suhas ly as he won silver today at tokyo paralympics 2020
पदक पटकावत इतिहास रचणाऱ्या सुहास यांना पंतप्रधान मोदींचा फोन; म्हणाले...

या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएएस अधिकारी सुहास यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'सेवा आणि क्रीडा यांचे एक अद्भुत मिश्रण, सुहास यथिराज यांनी आपल्या चमकदार खेळाने संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले आहे. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा.

पंतप्रधानांनी फोनवर दिल्या शुभेच्छा
ट्विट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुहास यथिराज यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांच्या शानदार खेळाचे कौतुकही केले. पहिल्यांदा सुहास यांचा विश्वासच बसत नव्हता, की ते देशाच्या पंतप्रधानांशी बोलत आहेत.

सुहास म्हणाले की, ''लहानपणी कधी विचार केला नव्हता की मी कलेक्टर होईन, पॅरालिम्पिकमध्ये एखादं पदक जिंकेन. पण देवाचा कृपा आणि आशीर्वाद राहिला. जेव्हा मी दिव्यांग म्हणून जन्मलो तेव्हा देवानं हे माझ्यासोबत काय केलं, असं वाटत होतं, पण आज पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली. मी खूप आनंदी झालो आहे.''

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''शारीरिक कमजोरीला तुम्ही स्वत:ची ताकद बनवलं. याचाच हा परिणाम आहे, ज्यामुळे देशाचा पंतप्रधान तुम्हाला फोन करण्यासाठी आतुर आहे. तुमचा स्वत:चा पराक्रम आहे. आत्मविश्वास आहे. जे खूप नियोजन करून चालतात, की मी हे बनेन ते बनेन, ती माणसे मागे राहतात. पण जी माणसे निरंतर काम करत राहतात, ती माणसं नक्कीच कुठेतरी पोहोचतात. तुम्ही करून दाखवलं. माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. देश तुमची वाट पाहतोय.''

सुहास यांचा अंतिम सामन्यात पराभव
बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल-४ च्या अंतिम सामन्यात सुहास यथिराज यांनी पहिला गेम २१-१५ असा जिंकला, पण दुसऱ्या गेममध्ये फ्रान्सच्या लुकास मजूरने २१-१७ ने विजय मिळवला, त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये यतीराजला १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

पॅरालिम्पिकमध्ये भारताची १८ पदके
४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १८ पदके आता भारताच्या खात्यात जमा झाली आहेत. जी या खेळाच्या इतिहासातील देशाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदकतालिकेत भारत २६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज