अ‍ॅपशहर

पोलंड उपांत्यपूर्व फेरीत

शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पोलंडने स्वित्झर्लंडवर टायब्रेकअखेर ६-५ अशी मात केली आणि युरो कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत स्वित्झर्लंड पंधराव्या, तर पोलंड २७व्या क्रमांकावर आहे.

Maharashtra Times 25 Jun 2016, 10:10 pm
स्वित्झर्लंडवर टायब्रेकअखेर ५-४ ने विजय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम poland beat switzerland to reach quarter finals
पोलंड उपांत्यपूर्व फेरीत


वृत्तसंस्था, सेंट इटिएन

शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पोलंडने स्वित्झर्लंडवर टायब्रेकअखेर ६-५ अशी मात केली आणि युरो कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत स्वित्झर्लंड पंधराव्या, तर पोलंड २७व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दहा वेळा हे संघ आमनेसामने आले होते. त्यात एकदाच स्वित्झर्लंडने बाजी मारली होती, हा एकमेव विजय स्वित्झर्लंडने १९७६मध्ये मैत्रीपूर्ण लढतीत नोंदविला होता, तर पोलंडने चार वेळा बाजी मारली होती. पाच लढती बरोबरीत सुटल्या होत्या. नुकत्याच झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पोलंडने स्वित्झर्लंडला हरविले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी पोलंड संघ उत्सुक होता.

पोलंडने जोरदार सुरुवात केली. पहिल्या अर्ध्या मिनिटातच पोलंडला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, मिलिकने मिळालेली संधी दवडली. त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून केला. त्यानंतरही पोलंडच्या खेळाडूंनी सातत्याने आक्रमक चाली रचल्या. दुसरीकडे स्वित्झर्लंडचे खेळाडूंच्या चालीही यशस्वी होत नव्हत्या. १८व्या मिनिटाला पोलंडच्या खेळाडूंचा प्रयत्न स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमरने हाणून पाडला. त्यानंतर ३३व्या मिनिटाला पोलंडच्या मिलिकला आणखी एक संधी मिळाली होती. मात्र, ही संधी देखील त्याने चेंडू गोलपोस्टच्या वर मारून दवडली. ३८व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ब्रेरीमने सुरेख प्रयत्न केला होता. मात्र, पोलंडचा गोलरक्षक ल्यूकास फॅबियन्स्कीने चेंडू गोलपोस्टच्या वर ढकूलन हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मिळालेला कॉर्नरवर स्वित्झर्लंडला गोल करण्यात यश आले नाही. उलट पोलंडने जोरदार प्रतिआक्रमण रचले. कामिल ग्रोसिस्कीने सुरेख चाल रचली. त्याने दिलेल्या पासवर याकूब ब्लाससीकोव्स्कीने गोल नोंदवून पोलंडचे खाते उघडले. त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत स्वित्झर्लंडच्या गोलरक्षक यानच्या पायांमधून चेंडू मारत गोल साजरा केला.

मध्यंतराला पोलंडकडे १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेरीस ८२व्या मिनिटाला झेरदान शकिरीने अफलातून गोल नोंदवून स्वित्झर्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. हा गोल डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्यानंतर निर्धारित वेळ १-१ अशी बरोबरीत सुटली. अतिरिक्त वेळेअखेरही बरोबरी कायम राहिल्याने टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. त्यात पोलंडने ५-४ ने बाजी मारली.

टायब्रेक...

स्वित्झर्लंड – ४

स्टिफन लिच्टस्टाइनर - १

ग्रॅनिट झाका – ०

झेरदान शकिरी – १

फॅबियन शार – १

रिकार्डो रॉड्रीगेझ – १

पोलंड - ५

रॉबर्ट लेवांडोव्स्की – १

मिलिक – १

कामिल ग्लिक – १

ब्लाससीकोव्स्की – १

क्रिकोवियाक - १

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज