वृत्तसंस्था, टोकियो
प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांना जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या ताकुरो होकी-सायाका हिरोता जोडीने प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी जोडीवर १४-२१, २१-१५, २१-१९ अशी मात केली. ही लढत एक तास चालली. पहिली गेम जिंकून प्रणव-सिक्की जोडीने जोरदार सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये जपानच्या जोडीने बाजी मारून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये ८-८ अशा बरोबरीनंतर ताकुरो-सायाका जोडी दोन पावले पुढेच राहिली. या जोडीने २०-१९ अशा आघाडीनंतर पुढील गुण घेत प्रणव-सिक्कीला संधी दिली नाही. या वर्षी लखनौ येथे झालेल्या सईद मोदी ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत प्रणव-सिक्कीने विजेतेपद पटकावले होते.