अ‍ॅपशहर

कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटीलने इतिहास घडवला, २१ वर्षानंतर पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा

Prithviraj Patil New Maharashtra Kesari: सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने इतिहास घडवला आणि २१ वर्षानंतर जिल्ह्याला हा किताब मिळून दिला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2022, 11:46 am
सातारा: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पृथ्वीराज पाटील यांने पटकावले आणि तब्बल २१ वर्षांनंतर इतिहास घडवला आहे. कोल्हापुर जिल्ह्याला हा किताब २१ वर्षांनंतर मिळाला आहे. माती प्रकारातून आलेला प्रकाश बनकर याला पराजीत करुन पृथ्वीराज पाटील यानं हा किताब पटकावलाय. मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर याला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले.

अवघ्या १९ वर्षांचा असलेला पृथ्वीराज पाटील हा शेतकरी कुटुंबातुन आलेला मुलगा आहे, त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद मानली जातीये पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी पटकावल्यानंतर त्याच्या वडील बाबासाहेब पाटील यांना अश्रू अनावर झाले. आमचे पांग फेडले अशी प्रतिक्रिया दिली.

कोण आहे पृथ्वीराज
पृथ्वीराज बाबासाहेब पाटील, देवठाणे तालुका पन्हाळा, शिक्षण १२ वी

>> सुरवातीचा आखाडा शाहु कुस्ती केंद्र कोल्हापूर शिंगणापुर

>> द मराठा लाईट इंन्फंन्ट्री रेजिमेंट बेळगाव हवलदार

>> आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच- सुभेदार रामचंद्र पवार , सुभेदार शिवाजी पाटिल , सुभेदार रणजीत महाडीक

>> जागतीक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा २०२१ रशिया, कास्य पदक ९२ किलो गट

>> जागतीक वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा नाॅर्वे २०२१ सहभाग

>> सिनीअर नॅशनल चॅम्पियन स्पर्धा २०२० रौप्य

>> नॅशनल ज्युनिअर कुस्ती स्पर्धा २०२१ सुवर्ण पदक
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज