अ‍ॅपशहर

नरवालच्या धडाक्याने यू मुम्बा पराभूत

प्रदीप नरवालच्या आक्रमक आणि चपळ चढायांच्या जोरावर आणि त्याने एकहाती खेळ करत तब्बल १८ गुणांची कमाई केल्यामुळे पटना पायरेटसने यू मुम्बावर ३६-३४ असा दोन गुणांनी विजय मिळविला आणि स्टार स्पोर्टस प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामातील जयपूरच्या टप्प्यात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली तर यू मुम्बासारख्या तगड्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पटनाने या विजयासह १० गुण मिळवित गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 2:04 am
Mahesh.vichare@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pro kabaddi
नरवालच्या धडाक्याने यू मुम्बा पराभूत


जयपूर : प्रदीप नरवालच्या आक्रमक आणि चपळ चढायांच्या जोरावर आणि त्याने एकहाती खेळ करत तब्बल १८ गुणांची कमाई केल्यामुळे पटना पायरेटसने यू मुम्बावर ३६-३४ असा दोन गुणांनी विजय मिळविला आणि स्टार स्पोर्टस प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामातील जयपूरच्या टप्प्यात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली तर यू मुम्बासारख्या तगड्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पटनाने या विजयासह १० गुण मिळवित गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममधील इनडोअर स्टेडियममध्ये हा तुल्यबळ सामना पाहायला मिळाला. पूर्वार्धात यू मुम्बा १४-१६ असा दोनच गुणांनी पिछाडीवर पडला होता पण याच फरकाने शेवटी त्यांना सामना गमवावा लागला. पटनाच्या प्रदीप नरवालने बुधवारी झालेल्या या सामन्यात कमाल केली. १८ गुणांची घसघशीत कमाई करत त्याने यू मुम्बाला निरुत्तर केले. त्यामुळे यू मुम्बावर लोण चढविण्यात पटनाला यश आले. पण उत्तरार्धात जेव्हा यू मुम्बाचा संघ २१-३० असा ९ गुणांनी मागे पडल्यानंतर ते सामना गमावतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण रिशांक देवाडिगाच्या दमदार चढायांमुळे यू मुम्बाला पुन्हा सामन्यात परतणे शक्य झाले. त्याला राकेश कुमार, सुनीलकुमार, जीवा कुमार यांनी पकडीत साथ देत पटनाला थोपवून धरले. त्यामुळे २१-३० असा मागे पडलेला यू मुम्बाचा संघ पाच मिनिटे शिल्लक असताना २९-३१ असा पुढे आला. त्यानंतर सामन्यातली रंगत अधिक वाढली.

तीन मिनिटे शिल्लक असताना यू मुम्बाने पटनावर लोण चढविण्यात यश मिळविले आणि सामना ३३-३३ असा बरोबरीत आला. त्यानंतर अनुप, प्रदीप यांच्या चढाया रिक्त गेल्या. त्यात गुणांची कमाई झाली नाही. अखेरचे एक मिनिट शिल्लक असताना यू मुम्बाचा भरवशाचा रिशांक देवाडिगाने एक गुण मिळविला आणि गुणफरक ३४-३३ असा दिसू लागला. प्रदीपने आपल्या अखेरच्या चढाईत दोन गुण मिळवून हा फरक ३४-३५ असा करत सामन्यातला थरार अबाधित ठेवला. अनुप कुमारची अखेरची चढाई असताना केवळ ७ सेकंद शिल्लक होते पण अनुप कुमारची पकड झाली आणि पटनाने ही लढत ३४-३६ अशी जिंकली. अनुपने रिशांकला छान साथ देत ६ गुण मिळविले. पण त्यांची विजय मिळविण्याची संधी अखेर हुकलीच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज