अ‍ॅपशहर

​ ऋतुजा भोसलेने पटकावले विजेतेपद

पुण्याच्या ऋतुजा भोसले हिने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले

Maharashtra Times 17 Sep 2017, 4:05 am
आयटीएफ टेनिस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune girl rutuja bhosale won
​ ऋतुजा भोसलेने पटकावले विजेतेपद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या ऋतुजा भोसले हिने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले आणि २३०० हजार डॉलर रकमेचे पारितोषिक मिळवले. तीन महिन्यांच्या अंतरात तिने मिळवलेला हा दुसरा आयटीएफ किताब आहे. जूनमध्ये औरंगाबाद येथे झालेली स्पर्धाही तिने जिंकली होती.
थायलंड येथे ही स्पर्धा झाली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ऋतुजाने तैपेईच्या हुआ-चेन ली हिचे आव्हान ६-४, २-६, ७-५ असे परतवून लावले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत दोन तास अन् ४१ मिनिटे रंगली. जागतिक क्रमवारीत ऋतुजा ७३८व्या स्थानावर आहे. ऋतुजाने १६ पैकी ७ ब्रेक पॉइंट जिंकले, तर १७ पैकी दहा वाचविले. मात्र, ऋतुजाला दुहेरी मुकुट मिळवण्यात अपयश आले. दुहेरीत ऋतुजा ऑस्ट्रेलियाच्या अलेक्झांडर वाल्टर्ससह सहभागी झाली होती. ऋतुजा अलेक्झांडर जोडीला दुसरे मानांकन होते. दुहेरीच्या अंतिम फेरीत झील देसाई-प्रांजला यडलापल्ली जोडीने ऋतुजा-अलेक्झांडर जोडीला ६-२, ७-५ असे नमविले आणि विजेतेपद मिळवले.
विजयानंतर ऋतुजा म्हणाली, ‘एकेरीची अंतिम लढत माझा कस पाहणारी होती. पहिल्या सेटपासून हुआने जबरदस्त खेळ केला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ती तेवढीच आक्रमक खेळली. निर्णायक क्षणी शांत राहून खेळायचे मी ठरविले. त्याचा फायदा झाला. मनगटाच्या दुखापतीनंतर ही माझी पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे स्पर्धेपूर्वी थोडे दडपण होते. मात्र, एक-एक विजयानंतर आत्मविश्वास उंचावता गेला. या विजयाने आत्मविश्वास वाढलाच, शिवाय क्रमवारीत मला याचा फायदा होईल. यापुढील स्पर्धांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करीन.’ २१ वर्षीय ऋतुजा पीवायसी येथे हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज