अ‍ॅपशहर

CWG: सायना आणि सिंधूमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूमध्ये सामना होणार आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सुवर्णपदकासाठी त्यांच्यात सामना होईल. या सामन्यात विजेत्याला सुवर्णपदक तर पराभूत होणाऱ््या खेळाडूला रौप्यपदक मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2018, 12:31 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cwg-badminton


बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूमध्ये सामना होणार आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सुवर्णपदकासाठी त्यांच्यात सामना होईल. या सामन्यात विजेत्याला सुवर्णपदक तर पराभूत होणाऱ््या खेळाडूला रौप्यपदक मिळणार आहे. यामुळे भारताची दोन पदकं निश्चित झाली आहेत.

सायनाने उपांत्य सामन्यात स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा २१-१४, १८-२१, २१-१७ अशा तीन सेटमध्ये पराभव केला. सायनाने पहिला सेट सहज जिंकला. पण दुसरा सेट गमवला. मात्र, सायनाने जोरदार पुनरागमन करत तिसरा सेट २१-१७ने जिंकत सामनाही जिंकला. तर दुसऱ््या उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने कॅनडाच्या मिशेलेचा दोन सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट जिंकण्यासाठी सिंधूला संघर्ष करावा लागला. मात्र, दुसरा सेट एकतर्फी जिंकत सिंधूने सामना जिंकला. सिंधून मिशेलेचा २१-१८, २१-८ अशा दोन सेटमध्ये पराभव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज