अ‍ॅपशहर

जागतिक कुस्ती स्पर्धा: आवारेने कांस्यपदक जिंकले

भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2019, 7:04 pm
नवी दिल्ली: भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-aware


कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केलं. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणाऱ्या गटात राहुलनं पदक पटकावलं आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज