अ‍ॅपशहर

ऑलिम्पिकच्या 'गुडविल अॅम्बेसेडर'साठी सचिनचा होकार

रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा सदिच्छादूत (गुडविल अॅम्बेसेडर) होण्यास विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने होकार दिला आहे. सदिच्छादूत (गुडविल अॅम्बेसेडर) म्हणून बॉलिवूड अभिनेता सलमान खानची नियुक्ती वादात सापडल्यानंतर समितीने सचिनसह अन्य संगीतकार ए आर रहमान यांनाही सदिच्छादूतपदासाठी विनंती केली होती.

Maharashtra Times 3 May 2016, 3:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin tendulkar accepts ioas invitation to become indias goodwill ambassador for rio olympics
ऑलिम्पिकच्या 'गुडविल अॅम्बेसेडर'साठी सचिनचा होकार

रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा सदिच्छादूत (गुडविल अॅम्बेसेडर) होण्यास विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने होकार दिला आहे. सदिच्छादूत (गुडविल अॅम्बेसेडर) म्हणून बॉलिवूड अभिनेता सलमान खानची नियुक्ती वादात सापडल्यानंतर समितीने सचिनसह अन्य संगीतकार ए आर रहमान यांनाही सदिच्छादूतपदासाठी विनंती केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात भारताचा झेंडा डौलाने फडकवण्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे मोठे योगदान आहे. तो महान क्रिकेटपटू आहेच; पण एक विनम्र आणि सज्जन माणूस म्हणूनही त्यानं स्वतःची ओळख निर्माण केलीय. त्याची ही प्रतिमा आणि क्रीडाक्षेत्राबद्दल त्याला असलेली आस्था लक्षात घेऊन, भारतीय ऑलिंपिक समितीने त्याला रिओ ऑलिंपिकचा सदिच्छादूत होण्याची गळ घातली होती. समितीनं सचिनला त्याबाबत एक पत्र पाठवलं होतं. त्याला आज सचिनने होकार कळवला आहे.

दरम्यान, याआधी ऑलिंपिक समितीनं सदिच्छादूत म्हणून 'दबंग' सलमानची निवड केली आहे. त्याबद्दल ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी नाराजी व्यक्त केली होती. क्रीडाक्षेत्रात सचिन तेंडुलकर, पी टी उषा, राज्यवर्धन राठोड यांच्यासारखे खेळाडू असताना इतर क्षेत्रातील व्यक्तीला अॅम्बेसेडर नेमायची गरजच काय?, असा सवाल त्यांनी केला होता. तर, अभिनव बिंद्रासारख्या काही क्रीडापटूंनी सलमानच्या नियुक्तीचं स्वागत केलं होतं. या वादानंतर, आणखीही काही 'गुडविल अॅम्बेसेडर' नेमणार असल्याचं ऑलिंपिक समितीनं स्पष्ट केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज