अ‍ॅपशहर

सायना सलामीला गारद

भारताच्या सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने विजयी सलामी दिली. तैपईच्या ताय झ्यू यिंगने सायनावर २१-१४, २१-१८ अशी ३८ मिनिटांत मात केली. जागतिक क्रमवारीत ताइ अव्वल क्रमांकावर असून, सायना अकराव्या क्रमांकावर आहे.

Maharashtra Times 15 Mar 2018, 3:00 am
बर्मिंगहॅमः भारताच्या सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने विजयी सलामी दिली. तैपईच्या ताय झ्यू यिंगने सायनावर २१-१४, २१-१८ अशी ३८ मिनिटांत मात केली. जागतिक क्रमवारीत ताइ अव्वल क्रमांकावर असून, सायना अकराव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी या दोघी अकरावेळा आमनेसामने आल्या होत्या. यातील नऊ लढती तायने, तर पाच लढती सायनाने जिंकल्या होत्या. या वेळीही ताइने सायनाला संधी दिली नाही. ताइचा हा सायनावरील सलग आठवा विजय ठरला. यंदाच्या मोसमातील ताइचा हा सायनावरील दुसरा विजय ठरला. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतही ताइने सायनावर मात केली होती. ताइच्या चपळ खेळासमोर पुन्हा एकदा सायना निष्प्रभ ठरली. ताइचे चक्रव्यूव्ह भेदणे तिला या वेळीही शक्य झाले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saina stranded by tais deception loses in round one
सायना सलामीला गारद


पुरुष एकेरीत तिसऱ्या सीडेड श्रीकांतला पहिल्याच फेरीत संघर्ष करावा लागला. श्रीकांतने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेरडेझचे आव्हान ७-२१, २१-१४, २२-२० असे परतवून लावले. ही लढत ५९ मिनिटे चालली. श्रीकांत पराभवाच्या उंबरठ्यावरून परत आला. ब्रिसकडे निर्णायक तिसऱ्या गेममध्ये २०-१९ अशी आघाडी होती. विजयापासून तो अवघ्या एक गुण लांब होता. मात्र, श्रीकांतने चिवट लढा देत सलग तीन गुण घेत गेमसह लढत जिंकली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज