अ‍ॅपशहर

आशियाई चॅम्पियनशिप: साक्षी मलिक, विनेशला रौप्य

आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी रौप्य पदकावर नाव कोरले. साक्षी मलिक आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंना आपल्या वजनी गटातील अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला

Maharashtra Times 12 May 2017, 10:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakshi malik settles silver in asian wrestling championship
आशियाई चॅम्पियनशिप: साक्षी मलिक, विनेशला रौप्य


आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी रौप्य पदकावर नाव कोरले.

साक्षी मलिक आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंना आपल्या वजनी गटातील अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रिओ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती जपानची रिसाको कवाई हिने ६० किलो वजनी गटात साक्षी मलिकचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षी पहिल्यांदाच ६० किलो वजनी गटात खेळत होती. याआधी ती ५८ किलो वजनी गटात खेळत होती.

रिओ ऑलिम्पिकमध्ये जखमी झालेल्या विनेश फोगटचे आश्वासक पुनरागमन झाले. विनेश फोगटला ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या नांजो सेएकडून ८-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीतील पराभवामुळे विनेशला आपली नाराजी लपवता आली नसली तरी तिने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तर, ४८ किलो वजनी गटात रितू फोगटला कांस्य पदक मिळाले. चीनची यानान सून जखमी झाल्यामुळे तिने सामन्यातून माघार घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज