मुंबई : श्री दत्तराज चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य लढतीत फेडरेशन चषक विजेत्या मुंबईच्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजीत त्रीपनकरला नमवून उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीच्या उपउपांत्य लढतीत कोल्हापूरच्या वयस्कर राष्ट्रीय विजेत्या शोभा कामतने प्रथम मानांकित काजल कुमारीला चांगलेच झुंजविले. पण काजलने १७-२०, २५-०, २५-९ असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली.
संदीप दिवे उपांत्य फेरीत
श्री दत्तराज चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2019, 4:00 am