अ‍ॅपशहर

सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक विजय दूर

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं आज ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या इव्हान डॉडीगच्या साथीनं तिनं अटीतटीची सेमी फायनल जिंकली आणि सातव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं.

Maharashtra Times 27 Jan 2017, 1:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मेलबर्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sania mirza reaches australian open final
सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक विजय दूर

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं आज ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या इव्हान डॉडीगच्या साथीनं तिनं अटीतटीची सेमी फायनल जिंकली आणि सातव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं.

दुसऱ्या मानांकित सानिया-डॉडीग जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ जोडीवर ६-४, २-६, १०-५ असा विजय मिळवला. १ तास १८ मिनिटं ही काँटे की टक्कर रंगली होती.

सानिया मिर्झाच्या खात्यात मिश्र दुहेरीच्या तीन ग्रँडस्लॅम ट्रॉफी आहेत. त्यातली शेवटची ट्रॉफी तिनं २०१४ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत जिंकली होती. तेव्हा ब्राझीलचा ब्रुनो सोअर्स तिचा जोडीदार होता. त्यानंतर, गेल्या वर्षी डॉडीगसोबत फ्रेंच ओपन जिंकण्याची संधी तिला होती. परंतु, लिअँडर पेस-मार्टिना हिंगीस जोडीकडून ते पराभूत झाले होते.

आता ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत कोलंबियाचा ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स यांच्याशी सानिया-डॉडीगला दोन हात करायचे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज