अ‍ॅपशहर

सनील शेट्टी मुख्य फेरीत दाखल

भारताच्या सौम्यजित घोष आणि सानील शेट्टी यांनी आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. राष्ट्रीय विजेत्या माधुरिका पाटकरला मात्र मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. सौम्यजित घोषसमोर प्राथमिक फेरीत सौदी अरेबियाच्या अली अल्खाद्रावीचे आव्हान होते. चुरशीच्या या लढतीत घोषने अलीवर ४-३ अशी मात केली. घोष म्हणाला, ‘सुरुवातीला बचावात्मक खेळ करण्याचा मला फटका बसला. आक्रमक सुरुवात करायला हवी होती. पहिल्या चार गेमनंतर मात्र मी योजना बदलली आणि त्याच्या कमकुवत बाजूंवर हल्ला चढवून बाजी मारली. अखेरचा गेम सर्वांत महत्त्वाचा होता.’ तत्पूर्वी घोषने जीत चंद्रावर ४-०ने मात केली होती. त्याने जीतवर ११-७, ११-६, ११-३, ११-४ अशी अवघ्या १७ मिनिटांत मात केली.

Maharashtra Times 15 Feb 2017, 4:00 am
नवी दिल्लीः भारताच्या सौम्यजित घोष आणि सानील शेट्टी यांनी आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. राष्ट्रीय विजेत्या माधुरिका पाटकरला मात्र मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. सौम्यजित घोषसमोर प्राथमिक फेरीत सौदी अरेबियाच्या अली अल्खाद्रावीचे आव्हान होते. चुरशीच्या या लढतीत घोषने अलीवर ४-३ अशी मात केली. घोष म्हणाला, ‘सुरुवातीला बचावात्मक खेळ करण्याचा मला फटका बसला. आक्रमक सुरुवात करायला हवी होती. पहिल्या चार गेमनंतर मात्र मी योजना बदलली आणि त्याच्या कमकुवत बाजूंवर हल्ला चढवून बाजी मारली. अखेरचा गेम सर्वांत महत्त्वाचा होता.’ तत्पूर्वी घोषने जीत चंद्रावर ४-०ने मात केली होती. त्याने जीतवर ११-७, ११-६, ११-३, ११-४ अशी अवघ्या १७ मिनिटांत मात केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanil shetty enters mens main draw
सनील शेट्टी मुख्य फेरीत दाखल


सानील शेट्टीने रोनित भांजावर ४-० अशी सरळ गेममध्ये मात करून जबरदस्त सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याचा चेक प्रजासत्ताकच्या लुबोमिर जॅनकार्कविरुद्ध कस लागला. अखेर सानीलने लुबोमिरला ४-३ असे पराभूत करून मुख्य फेरी गाठली. युवा खेळाडू मानव ठक्करने अव्वल सीडेड पोर्तुगालच्या जाओ गेराल्डोला चांगली टक्कर दिली. मात्र, मानवला ११-९, ९-११, ३-११, ११-६, ६-११, ११-१३ असा पराभव पत्करावा लागला. मानवने पहिल्या पात्रता फेरीत अर्जुन घोषला ४-१ असे नमविले होते.

माधुरिका पाटकरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तिने पात्रतेच्या पहिल्या फेरीत कृत्विका रॉयवर ४-१ने मात केली होती. मात्र, सुथिर्ता मुखर्जीने तिला ४-१ने पराभूत केले. अर्चना कामत आणि प्रियांक पारीक यांनी मुख्य फेरी गाठली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज