म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत सरस्वती भुवन विज्ञान कॉलेज संघाने महिला गटात विजेतेपद पटाकावले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. अंतिम सामन्यात सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय संघाने अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालय संघाचा पराभव करुन विजेतेपद संपादन केले. विजेत्या संघात दीपाली पट्टेकर, कल्याणी वडगावकर, पल्लवी पवार यांचा समावेश आहे. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विशाल देशपांडे, डॉ. पूनम राठोड यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, उपप्राचार्य डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. दीपक कायंदे, डॉ. अंजली नाईक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.