म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्कूलच्या सत्यम काकडेने चौदा वर्षांखालील गटात शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, शाळेच्या संचालिका माधुरी जाधव, मुख्याध्यापिका रमा गायकवाड यांनी सत्यमचे अभिनंदन केले. सत्यमला क्रीडा शिक्षक मुख्तार सय्यद व सुयश नाटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.