टी-२० क्रमवारीत
शफाली अव्वल
सिडनी : भारताची १६ वर्षीय शेफाली वर्मा महिलांच्या आयसीसी टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. शेफालीने (७६१ गुण) न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (७५०) मागे टाकले. सूझी ऑक्टोबर २०१८ पासून क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. भारताची स्मृती मानधनाची सहाव्या स्थानावर घसरण झाली असून, जेमिमा रॉड्रिग्ज नवव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत दीप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव अनुक्रमे पाचव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. सांघिक क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या, तर भारत चौथ्या स्थानावर आहे.
...........