अ‍ॅपशहर

टेनिस महासंघावर सोमदेव कोपला

वयाच्या ३१व्या वर्षी निवृत्त झालेला टेनिसपटू सोमदेव देववर्मनने अखिल भारतीय टेनिस महासंघावर शरसंधान करताना खेळाडूंना मदत करणारी योग्य रचना तयार करण्यात संघटनेला रस नाही, अशी टीका केली आहे.

Maharashtra Times 3 Jan 2017, 4:00 am
चेन्नई : वयाच्या ३१व्या वर्षी निवृत्त झालेला टेनिसपटू सोमदेव देववर्मनने अखिल भारतीय टेनिस महासंघावर शरसंधान करताना खेळाडूंना मदत करणारी योग्य रचना तयार करण्यात संघटनेला रस नाही, अशी टीका केली आहे. चेन्नई ओपनसाठी आलेल्या सोमदेवने पत्रकारांशी बातचीत करताना टेनिस महासंघाला लक्ष्य केले. तो म्हणाला की, मला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मला खजिल होण्याची गरज नाही. त्यांना मदत करण्यात कोणताही रस नाही. मला डेव्हिस कपसाठी २००७मध्ये बोलावण्यात आले पण मी विमानतळावर एकटाच प्रतीक्षा करत होतो, तेव्हा मला जाणीव झाली की....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम somdev criticises aita
टेनिस महासंघावर सोमदेव कोपला


सोमदेवने सांगितले की, मला माझ्या प्रशिक्षकांनी सांगितले होते की, या लोकांना दूर ठेव. कुणावरही आरोप करू नकोस.

टेनिस महासंघावर टीका केली तर त्याचे परिणाम विपरित होतील हे ठाऊक असले तरी सोमदेवने ती टीका टाळलेली नाही. तो म्हणतो, मी जर महासंघावर टीका करत राहिलो तर कदाचित मला त्यांच्याकडून कोणतेही काम सोपविण्यात येणार नाही. पण मी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. काम जबाबदारीने करण्याची माझी पद्धत आहे आणि मी ते करू शकेन.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज