अ‍ॅपशहर

पुण्याच्या मुलींनी जेतेपद राखले

पुण्याच्या मुलींच्या संघाने १४ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजेतेपद राखले. पुण्याच्या मुलांच्या संघाला मात्र अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. सांगलीने मुलांमध्ये बाजी मारली.

Maharashtra Times 7 Feb 2017, 2:00 am
पालघर : पुण्याच्या मुलींच्या संघाने १४ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजेतेपद राखले. पुण्याच्या मुलांच्या संघाला मात्र अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम state level subjunior kho kho pune sangli winners
पुण्याच्या मुलींनी जेतेपद राखले


चिंचणीतील के. डी. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. सोमवारी झालेल्या मुलींच्या अंतिम लढतीत पुण्याच्या संघाने औरंगाबादवर ८-६ अशी एक डाव अन् २ गुणांनी मात केली. मध्यंतराला पुण्याकडे ६ गुणांची निर्णायक आघाडी होती. पुणे संघाकडून हर्षदा करे (४.३० मि. व १ मि.), राधिका शिंदे (२ मि. व २.५० मि.), साक्षी करे (१.४० मि.) व ऋत्विका राठोड (४ गडी) यांनी चमकदार कामगिरी केली. औरंगाबादच्या ऋतुजा सुराडकरने पुण्याच्या पाच खेळाडूंना बाद केले.

मुलांच्या अंतिम लढतीत सांगलीने पुण्याचा १०-९ असा १ गुण व १० सेकंद राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. मध्यंतराला सांगलीकडे एका गुणाची आघाडी होती. सांगलीच्या सौरभ अहिर (१.३० मि., २ मि. व २ गडी), श्रेयस यादव (१.५० मि. व १ गडी) व नागेश चोरलेकर (२.२० मि., १.३० मि. व ३ गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. पुण्याच्या राहुल वाघ (२ मि., १.३० मि. व १ गडी) व रविकिरण कच्छवे (४ गडी) यांची लढत अपूर्ण ठरली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षकचे पारितोषिक मुलांच्या गटात राहुल वाघ (पुणे) आणि मुलींच्या गटात हर्षदा करे (पुणे) यांना देण्यात आले. सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार सांगलीच्या नागेश चोरलेकर (सांगली) आणि ऋतुजा सुराडकर (औरंगाबाद) यांना मिळाला. स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून सौरभ अहिर (सांगली) आणि साक्षी करे (पुणे) यांना गौरविण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज